dr.satish best web design developer for mac

कुमरी ग्रामपंचायत :

घटप्रभाच्या कुशीत व सहा गावांच्या मुशीत वसलेलं, गडहिंग्‍लजपासून अवघ्या 30 कि.मी अंतरावर असलेलं माझं गांव ‘कुमरी’. गावापासून 700 मीटरवर घटप्रभा ही नदी आहे. फाटकवाडी प्रकल्पामुळे सदर नदीला बारमाही पाणी आहे. त्यामुळे गाव नेहमी हिरव्यागार वनश्रीनं नटलेलं, सुख-समाधानाने बहरलेलं, हिरव्यागार चादरीन लपेटल्यासारखे भासते. गावच्या बाजूने घटप्रभा नदी वाहत असल्याने बागायती शेतीसाठी बारा महिने नदीपात्रामध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. रवळनाथ हे ग्रामदैवत आसणाऱ्या ह्या गावांची लोकसंख्या 1279 इतकी आहे तसेच कुमरी गाव व यमेहट्टी गावच्या सीमेवर मोठा असा तलाव आहे. त्यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी मुबलक पाणी आहे. गावाचे खास विशिष्ट म्हणजे कुमरी गावातुन प्रतापराव गुजर यांचे स्मारक 5 की.मी इतक्या अंतरावर आहे.


ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

गावामध्ये पर्यावरण संतुलित ग्राम योजनेमधून वृक्षलागवड केली गेली आहे. ग्रामपंचायतीमधून कृषीविषयक योजनांची प्रदर्शने भरवून ग्रामस्थांना शेतीविषयक माहिती व मार्गदर्शक करण्यात आले आहे. तसेच स्वच्छता मोहीमेअंतर्गत ग्रामस्वच्छता करण्यात आली. गावातील गरीब विद्यार्थांना ग्रामपंचायतीमार्फत शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले आहे. पर्यावरण संतुलनासाठी गावामध्ये प्लास्टिक बंदीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे.

सरपंच
श्री. नितीन गोविंद वाईंगडे

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. अनुबाई हरिबा पोळकर

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
सौ. कविता अमर कोकीतकर

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Kumari Grampanchayat
A/p - Kumari Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone :

Office :